उदगीर रस्ता वाहतूकोंडी लवकरच सुटेल= पोलिस अधिक्षक सोमय मुंढे = पुढील 48 तासात रस्त्यांवरील अतिक्रमण काढू= नप मुख्याधिकारी क्यातमवार = वाहतूक सुरळीत करण्यासाठी आयोजीत बैठकी बद्दल शहर पोलिस स्टेशन निरिक्षक रामेश्र्वर कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन = वाहतुकीच्या नावावर सामान्यांना त्रास नको= मा. आमदार मनोहर पटवारी = अधिकाऱ्यांनी सर्व विभागात ताळमेळ ठेऊन कार्य करावे= आमदार संजय बनसोडे उदगीर= आज उदगीर येथे शहरातील विस्कळीत वाहातुकी सुरळीत करण्यासाठी पोलिस अधिक्षक,शहर पोलीस स्टेशन ने बैठक आयोजीत केली होती त्यात अनेकांनी या बाबत अनेक सूचना व्यक्त केल्या, शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक रामेश्र्वर कदम यांनी शहरातील वाहतूक समस्या आणि या वर उपाय सुचविले, सर्वाचा रोष नगर पालिकेवर होता कारण की नप अधिकारी साथ देत नाहीत म्हणून,या वर मुख्याधिकारी क्यतामवार यानी रस्त्यावरील अतिक्रमणे पुढील 48 तासात काढू असे आश्वासन दिले, आता पाहावे लागेल की प्रत्येक वेळेला फक्त पोलिस अधिकारी व कर्मचारी पुढे रहात होतो पण अन्य विभाग गायब रहात होते, आता खरेच या बैठकीचा काही परिणाम होतो को मागील सारखेच होतें हे पाहावे लागेल या वेळेस पोलिस अधिक्षक सोमय्या मुंढे, आमदार संजय बनसोडे, मा. आमदार गोविंद केंद्रे, मा.आमदार मनोहर पटवारी, बस्वराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटूरे तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप भागवत,शुभम क्यातमवार,आरटीओ विजय भोर, महावितरण कार्यकारी अभियंता दराडे सह अनेक अधिकारी व उदगीर कर उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
