अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण त्वरीत थांबवा, नप मुख्याधिकाऱ्या वर कार्यवाही करा= पूर्व नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे उदगीर= येथील नगर पालिकेने निर्माण केलेले अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अनावरण आमदार हे प्रोटोकॉल न पाळता करत असून नगरपालिकेने या अनावरण समारंभासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना आमंत्रित केलं असून त्यांचा वेळे नुसार हा अनावरण समारंभ होणारं असताना आमदार यानी प्रोटोकॉल न पाळता या पुतळ्या साठी सर्व खर्च नगरपालकेने केले असता फक्त प्रसिध्दी साठी काही लोकांना हाताशी धरून 7/6/23 बुधवारी हा अनावरण समारंभ करत असून त्यांना मुख्याधिकारी ही साथ देत आहेत ,येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या साठी जिल्हाधिकारी यानी त्वरीत हा अनावरण समारंभ रद्द करावा व मुख्याधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी असे पत्र पूर्व नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यानी जिल्हाधिकारी यांना मेल ने पाठवले आहे तर नपा मुख्याधिकारी क्यातामवर यानी पत्र पोलिस प्रशासनास देउन जा.क्र.उ न प/4/1/साबा/814/कावी/2023 ता .6/6/2023 ने पोलिस प्रशासनाने येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून हा कार्यक्रम रद्द करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी असे पत्र दिल्याने ,प्रशासन आता हा अनावरण समारंभ रद्द करते की होऊ देते हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

