*वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण* -------------------- *लाखो वारकऱ्यांना दिलासा* उदगीर: पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल. वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला आहे
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image