प्रति दिंडीतील ज्ञानोबा माऊली तुकाराम गजराने दुमदुमली उदगीर नगरी उदगीर= उदगीर येथे आज पंढरपूर दिंडी च्या स्वरूपात श्री शंकरलिंग मठापासून प्रति दिंडी सोहळा काढण्यात आला त्या दिंडीतील ज्ञानोबा माऊली तुकाराम गजराने संपूर्ण उदगीर शहर दुमदुमून गेले आज उदगीर शहरात प्रति माऊली दिंडी सोहळा आयोजीत करण्यात आला होता,ही दिंडी श्री शंकरलींग महाराज मठात पालखी ची मा. आमदार सुधाकर भालेराव, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्र्वर गोरे, पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते विधिवत पुजा करून दिंडी मार्गस्थ करण्यात आली,सदरील दिंडी ही श्री शंकरलिग महाराज मठातून निघून चोबारा, कॉर्नर, पोलिस स्टेशन समोरून शिवाजी चौक,ते दुधिया हनुमान मंदिर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत काढण्यात आली,या दिंडीतील ज्ञानोबा माऊली तुकाराम गजराने संपूर्ण उदगीर शहर भक्तीमय झाले होते, या दिंडीत हजारो वारकरी, महिला भजनकरी, शालेय विद्यार्थी, सामजिक संघटना मोठया उत्साहात शामिल झाल्या होत्या,आज उदगीर शहराच्या रस्त्यावर पंढरी अवतरल्याचे चित्र दिसत होते,
• श्रीनिवास मदनलाल सोनी


