भाजी मार्केट व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याची लूट त्वरीत बंद करा = कृ. उ. बा.समिती सभापती शिवाजीराव हुडे उदगीर= उदगीर भाजी मंडीतील व्यापारी शेतकऱ्याकडून 10% अडत घेत आहेत ,सोबत फस्ती म्हणून 5 रुपये वसूल करत असून नियमाप्रमाणे शेतकऱ्याकडून अडत घेऊ नये असे आदेश असताना ही येथील व्यापारी शेतकऱ्याकडून अडत तेही 10% घेत असून हे नियम बाह्य असून त्या बद्दल सदरील व्यापाऱ्याच्या बैठकीत सभपती शिवाजीराव हूडे यानी व्यापाऱ्यास सूचना करून शेतकऱ्याची लूट त्वरीत थांबवण्याची सूचना केली आहे उदगीर भाजी मंडईत शेतकऱ्याच्या भाजी पाल्यास खरेदीदार अडत्या 10% अडत घेत आहे, सोबत फस्ती म्हणून 5 रुपये घेत आहेत, अनेकांकडे खरेदी विक्री चां परवाना नसताना ते खरेदीदार बनले आहेत, भाजी मंडईत कोणी पहाटे चार ला,कोणी पाच ला,तर कोणी 6 वाजता सवाल करत असून , भाजी पाल्याचां सवाल एकच वेळेस घ्यावा अशी सूचनाही त्यांनी व्यापाऱ्याच्या बैठकीत केली, व्यापाऱ्यांनी भाजी खरेदी विक्री दुकानदाराला दुकाने द्यावी अशी ही मागणी केली असता ते म्हणाले की अनेकांचे खरेदी विक्री चां परवाना नसताना ते खरेदीदार म्हणून खरेदी विक्री करत आहेत, संबंधितांनी त्वरीत परवाना काढून घ्यावा तसेच अनेकांचे परवाना नूतनीकरण नाही त्यांनी त्वरीत परवाना नूतनीकरण करुण घ्यावा म्हणजे त्या प्रमाणे नवीन जागा घेऊन तेथे दुकाने देण्याची वेवस्था करता येईल,अनेक जण भाजी पाल्याच्या परवाण्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंच व अन्य खरेदी करत असून तेही जास्त अडत घेत आहेत तेही त्वरीत बंद करावे, नियमानुसार सदरील अडत ही खरेदीदार यानी द्यावी असे नियम असून कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये अन्यथा आम्हास योग्य ती कार्यवाही करावी लागेल असे ही सभापती यानी सांगितले तर शेतकऱ्याची भाजी पाल्यात होणारी लूट त्वरीत थांबवण्याची सूचना ही त्यांनी केली असून या सूचनेचे किती खरेदीदार पालन करतात हे पाहावे लागेल,या वेळेस सभापती शिवाजीराव हूडे सोबत संचालक गौतम पिंपरे,सचिव प्रदीप पाटील सह अनेक भाजी मंडईतील व्यापारी होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
