ना. संजय बनसोडे यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार 14 जुलै रोजी उदगीरात उदगीर= येथील आमदार तथा पूर्व गृह राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्या नंतर पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात 14 जुलै रोजी येत असून त्या दिवशी दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद मैदानावर सर्व पक्षीय नागरी सत्कार करण्याचे शासकीय विश्रागृहावर झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे,हा नागरी सत्कार भव्य व दिव्य करण्याचे सर्व उपस्थितांनी ठरवले असून या बैठकीस राजेश्वर निटूरे, सिध्देश्वर पाटिल, भरत चामले,गुलाब पटवारी,राहुल केंद्रे सुधीर भोसले, रामभाऊ तिरुके, देविदास कांबळे,रामराव बिरादार,श्याम डावळे सह अनेक मान्यवर, सरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
