आ.बाबासाहेब पाटील व अफसर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फी उदगीर= 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार फुटून गेले होते त्यांना आ बाबासाहेब पाटील व आफसर शेख यांनी पाठिंबा दर्शविला होता हे कृत्य पक्ष विरोधी असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी 18/07/2023 रोजी जा क्र.135 ने पत्रकाराना पत्र देउन एकूण 21 ला बडतर्फ केल्याचे सांगितले असून त्यात अहमदपूर चे आमदार बाबसाहेब पाटील व औसा चे अफसर शेख यांचा समावेश असून त्यांचा पक्षाशी काही संबंध नसून त्यांनी पक्ष्याचे चिन्ह , पद वापरू नये असे पत्रात नमूद केले असून राष्ट्रवादीचा गट अता काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

