राजश्री शाहू निवासी मूकबधिर विद्याल उदगीर येथील प्रकार" कर्मचारी उपाशी संस्थाचालक तुपाशी" उदगीर:-धरणग्रस्त व्यायाम शैक्षणिक ग्रंथालय व सेवाभावी मंडळ शेंद द्वारा संचलित राजश्री शाहू निवासी मूकबधिर विद्यालय जळकोट रोड उदगीर या शाळेतील कर्मचारी 2014 पासून वेतन न काढल्याने उपासमारी व दिवाळीखोरीची वेळ आलेली आहे ही शाळा समाज कल्याण विभाग लातूर यांच्या अधिनस्त संस्थाचालक हे शासनाचे नियम डावलून कर्मचाऱ्यांचे 2014 पासून वेतन देत नसून त्यांच्यावर अत्याचार करत आहेत संस्थाचालक डॉक्टर संजय दिगंबर मुळे 2014 चे कर्मचारी डावलून नवीन कर्मचारी भरून जुन्या कर्मचारी समाज कल्याण अधिकारी आयुक्तालय पुणे व शासन यांची दिशाभूल करून भरती करत असून शासनाचे परिपोषण आहार अनुदान काढून लाखोचे अनुदान लाटत आहेत जे कर्मचारी शिक्षकांपर्यंत शाळेवर कार्यरत नाहीत त्यांची प्रशासकीय मान्यता अधिकाऱ्यांची दिशाभूल करून बोगस कागदपत्र दाखल करून काढण्याच्या तयारीत असून जे कर्मचारी 2014 पासून कार्यरत आहेत त्यांना डावलून त्यांच्यावर संस्थाचालक उपासमारीची वेळ आणत आहेत संचालक बोगस नवीन कर्मचारी भरती करून दरवर्षी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत त्यांच्याकडून लाखोंची रक्कम घेऊन त्यांचे अपरोल व वेतन न काढता दुसऱ्या वर्षी परत नवीन कर्मचारी भरून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन फसवणूक करत आहे. कर्मचाऱ्यावर नोकरीवरून कमी करण्याची धमकी देत असून कर्मचारी उपाशी आणि संस्थाचालक तुपाशी याच युक्तीचा अनुभव होत आहे. उपोषण करून आणि आत्मदहनाचे लेटर देऊन सुद्धा या गेंड्याच्या कातडीच्या लोकांना काहीही फरक पडत नाही याची कसून चौकशी व्हावी , संस्था चालकावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी पीडित कर्मचाऱ्यांनी केली आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

