8 हजाराची लाच घेताना देवणी चे पी एस आय मुजाहेद शेख उदगीरात लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात उदगीर:- मुजाहेद खुर्शीद शेख, वय 55 वर्षे, पद - पोलीस उप निरीक्षक, (वर्ग- 2) नेमणूक- देवणी पोलीस स्टेशन जि. लातुर, मुळ रा. भाग्य नगर अहमदपुर जि. लातूर सध्या रा. आयशा कॉलनी उदगीर जि. लातूर यानी यातील तक्रारदार यांना, देवणी पो.स्टे. येथे काळया मातीच्या चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करणे बाबत केलेल्या तक्रारी अर्जात तक्रारदाराला कुठलाही अडथळा न येवू देता तक्रारदाराच्या बाजूने अर्ज निकाली काढल्याचा मोबदला तसेच भविष्यात देखील तक्रारदारास कडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीत मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी आलोसे शेख यांनी सुरुवातीस सोन्याचं बिस्कीट आणि स्वतः साठी 3,000/- रुपये, साहेबांसाठी 5,000/- रुपये लाचेची मागणी करून नंतर तडजोडी अंती स्वतः साठी 3,000/- रुपये, साहेबांसाठी 5,000/- रुपये असे एकूण 8,000/- रुपये पंचासमक्ष लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे थोड्याच वेळाने तक्रारदार आलोसे शेख यांना गुलजार हॉटेल समोर रोडवर उदगीर येथे लाच मागणी केलेली रक्कम 8,000/- रुपये देण्यासाठी गेले असता आलोसे शेख यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम 8,000/- रुपये स्वतः स्विकारली. आरोपीस लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. उदगीर पोलीस स्टेशन जि.लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरील कार्यवाही मार्गदर्शक:- डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी :- पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर. सापळा अधिकारी व पथक :- अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक व टीम अँटी करप्शन ब्यूरो, लातुर यानी केली तपास अनवर मुजावर पोलिस निरिक्षक अँटी करप्शन बुरो लातूर हे करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी