उदगीर नगर पालिकेत अंधेर नगरी, चौपट राज ? अधिकाऱ्यापासून अनेक कर्मचारी गायब ! उदगीर:- उदगीर नगर पालिकेत सध्या प्रशासकीय कारभार चालू असल्याने , अंधेर नगरी चौपट राज चालु असल्याची प्रचिती तिसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर जनतेस येत असून,आज सोमवार, शनिवार रविवारी दोन दिवस सुट्टी नंतरही नगर पालिकेत अधिकारी तर सोडाच पण सामान्य कर्मचारी ही त्याच्या जागेवर नसल्याने कामासाठी तिसऱ्या मजल्यावर येणाऱ्या जनतेस परेशानी चा सामना करावा लागत असून ही त्यांची तेथे दाद न फिर्याद ही परिस्थिती दिसत असून एकीकडे शासन ,शासन आपल्या दारी ही संकल्पना राबवित असताना येथील नगर पालिकेत अधिकारी तर सोडाच परंतु कर्माचारी ही हजर नसल्याचे जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी





