पावसामुळे बस स्टँड झाले चिखलमय, प्रवासी परेशान उदगीर= येथील बस स्टँड चे बांधकाम चालु असून या बांधकामाच्या बाजूस तात्पुरते बस स्टँड उभे केले आहे, पावसामुळे बांधकामाची माती या भागात पसरल्याने हे बस स्टँड चीखलमय झाले आहे, दररोज येथून हजारो प्रवासी महीला पुरुष, ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात त्यांना पारेशान व्हावे लागत असून या चिखला मध्ये अनेक प्रवासी घसरून पडत आहेत, खरे तर लाखो रुपयाचे उत्पन्न असून ही या कडे कोणीच लक्ष देत नाहीत, या बस स्टँड चे बांधकाम पूर्ण होजो पर्यन्त सदरील बस स्टँड अन्यत्र हलवावे अशी मागणी प्रवासी करत असून ही, प्रवाशाची हाल अपेष्टा पाहून ही कोणीच त्यांच्या मागणी कडे लक्ष देत नसल्यानें प्रवासी संताप व्यक्त करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
