छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्डयात गुत्तेदारास घालून खड्डा बुजवा:- संतप्त उदगीरकर उदगीर:- अनेक दिवसापासून उदगीर व तालुक्यातील रस्त्यांचे काम कसे निकृष्ट दर्जाचे होत आहे हे अनेक संघटनानी वेळोवेळी तक्रार करून दाखउन दिले पण भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांचा मलिदा मिळत असल्याने तक्रारीचा काहीच परिणाम होत नाही, अश्यातच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यांचे डांबरीकरण प्लेवर ब्लॉक वर काही दिवसा पूर्वी झाले असून, कामाच्या वेळेस अनेकांनी हे डांबरीकरण प्लेवर ब्लॉक वर होत असून किती दिवस हा रस्ता टिकेल हा प्रश्न उपस्थित केला खरा पण भ्रष्ट अधिकाऱ्यांना हा आरोप समजला नाही त्यांनी या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यासाठी गुत्तेदारास साथ देऊन त्याच्या पाठीमागे खंबीर उभे राहिल्याने गुत्तेदाराचे मनोबल वाढले त्यांनी थातुर मातुर डांबरीकरण करून खिसा भरून घेतला खरा पण अती तिथं माती या म्हणी प्रमाणे काही दिवसातच चौकात डांबर फुटून मोठा खड्डा पडला असून यात अनेक वाहनधारक आपटत आहेत,पण गुत्तेदार, भ्रष्ट अधिकाऱ्यांना याचे काहीच देणघेणे दिसत नसल्याने जनता त्रासून या खड्डयात संबंधित गुत्तेदारास घालून खड्डा बुजवा म्हणजे अन्य ठिकाणचे काम तरी निकृष्ट दर्जाचे होणार नाही असे म्हणत आहेत .
• श्रीनिवास मदनलाल सोनी
