उदगीर रोटरीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न उदगीर :- रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्यामार्य कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तीन दिवसीय आरोग्य तपासणी घेण्यात आले. त्यात इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींचे डोळे तपासणी, दंत तपासणी, सीबीसी रक्त तपासणी, इतर जनरल तपासणी करण्यात आले. शिबीर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे होत्या. यावेळी सचिव सरस्वती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. बाळासाहेब पाटील, सहसचिव डॉ. सुधीर जाधव, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय पाटील, श्यामार्यच्या मुख्याध्यापिका तृप्ती पंडित(ज्ञाते), रोटरी क्लबचे संतोष फुलारी, व्यंकट कणसे, डॉ. सायराम श्रीगिरे, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. मोहन वाघमारे, रविंद्र हसरगुंडे, डॉ. सुनीता चवळे, विशाल जैन, प्रमोद शेटकार, प्रशांत मांगुळकर, ज्योती चौधरी, गजानन चिद्रेवार, अनिल मुळे, सुयश बिरादार, विजय पारसेवार, डॉ. राजेंद्र घाटे, डॉ. अस्मिता भद्रे, डॉ. नम्रता कोरे, गुरुराज गुरनाळे, विष्णुकांत जाधव, लॅब टेक्निशियन गणेश चिद्रेवार, सचिन पवार, श्यामलाल माध्यमिक विद्यालयाचे शालेय समिती सदस्य सुकणीकर, पर्यवेक्षक प्रवीण भोळे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. बाळासाहेब पाटील यांनी, सध्याच्या काळात आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे, कारण आज आपल्या देशात ज्या वेगाने सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्याच वेगाने आपल्या वातावरणात अनेक प्रकारचे आजारही वाढू लागले आहेत. ज्याचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे आणि संतुलित आहार घेतला पाहिजे असे सांगितले. डॉ. श्रीगिरे यांनी, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने सर्वांनी पाणी उकळून प्यावे असे आवाहन केले. डॉ. मोहन वाघमारे यांनी, निरोगी जीवनासाठी दातांची स्वच्छता आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका तृप्ती पंडित यांनी, व्यक्तीच्या खाण्यापिण्यामध्ये स्वच्छता, स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो इत्यादीसारखे रोग उद्भवतात. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते असे सांगितले. या शिबीरात डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. मोहन वाघमारे, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ महेश जाधव, डॉ. अस्मिता भद्रे, डॉ. नम्रता कोरे, डॉ. दिपीका भद्रे, डाॅ प्राजक्ता जगताप,डाॅ. शिवकुमार होट्टूलकर ,डॉ. शिवकांत यांनी वैद्यकीय सेवा दिली. शिबीरात एकूण ७०० विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीहरी निडवंचे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रवीण भोळे यांनी केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
