उदगीरातील मालमत्ता भावाढीमुळे सामान्य जनतेच्या घराचे स्वप्न झाले कठीण! 👉 प्रॉपर्टी चे भाव वाढ कोण करत आहेत,दलाल,दोन नंबर पैसेवाले का अन्य कोणी, याचा तपास होणे जरुरी 👉 या भाव वाढीस आयकर विभाग जबाबदार ? 👉 मागील पाच वर्षात किती जणांनी प्रॉपर्टी घेतली,विकली याचा संपूर्ण डाटा शासनाकडे, आयकर विभागाकडे उपलब्ध असतानाही,किती मालमत्ता घेणाऱ्यांची चौकशी आयकर विभागाने किंवा अन्य विभागाने केली याचे ही मोजमाप होणे जरुरी 👉 शहरात कुठला ही प्लॉट घ्यायचे असेल तर उघड उघड बाँड वर नोटरी करून करोडो ची देवाणघेवाण होत असताना किती जणांनी मालमत्ते साठी बाँड घेतला,नोटरी कोणाकडे केली याची ही चौकशी होणे जरुरी 👉 नोट बंदी नंतर दोन नंबर पैश्याची सर्वात जास्त गुंतवणूक उदगीर व शहर परिसरातील मालमत्तेत ? उदगीर:- उदगीर शहरांतील व परिसरातील मालमत्ते च्या किमती मागील पाच वर्षात 25 पट तर काही भागात 50 पट वाढल्याने सामान्य जनतेस आता उदगीर व परिसरात प्लॉट घेऊन घर बांधणे सोपे राहिले नाही उदगीर व परिसरात दोन नंबर पैसेवाल्यानी,दलालांनी मालमत्ते च्या किमती एवढ्या वाढविल्या की सामान्य माणूस आता तरी शहर व परिसरात प्लॉट घेऊन घर बांधूच शकत नसल्याचे चित्र असून या भाव वाढीस खरे तर प्रशासनातील काही अधिकारी, आयकर विभाग जबाबदार असल्याचे चर्चिले जात आहे,मागील पाच वर्षात एक लाखाचा प्लॉट 30,40,50 लाख तर काही भागात करोडो ला विकला जात आहे अणि अशी मालमत्ता घेणारे कमी नाहीत , हे 1रूपया ला घेऊन पुढे 100 करत आहेत, तर शहर व परिसरात काही पलोटिंग खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या असून बाँड वर मुदतीत करोडो ची मालमत्ता खरेदी चा वेवहार करायचा आणि लाखो ची रजिस्ट्री करून अल्पावधीत अब्जोधिश झाल्याची चर्चा ही रजिस्ट्री कार्यालय परिसरात चर्चिली जात असून , अश्या व्यवहारातून रजिस्ट्री विभागातील काही अधिकारी,दलाल, बाँड विक्रेते ही आज करोडपती झाल्याची चर्चा खुले आंम सुरू असूनही प्रशासनाचा गुप्तमाहिती विभाग, आयकर विभाग गप्प असल्याने हे सगळे चालु असल्याची चर्चा ही जोरात आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी