जी एस टी च्या नावाखाली सराफा व्यापाऱ्या कडून ग्राहकाची लूट ? उदगीर:- उदगीर येथील सराफ व्यापाऱ्यांकडून जी एस टी च्या नावाखाली खुली लूट चालू असल्याची चर्चा असून ही लूट कोणाच्या आशीर्वादाने चालु आहे हे ग्राहकांना समजत नाही,कारण की सोन्याचा भाव दररोज खाली येत असून ही उदगीर मधे हा भाव चढाच आहे, ज्या वेळेस भाव वाढ होते त्या वेळेस एका मिनिटात भाव वाढी चे फलक लागतात तर दुसरी कडे रोज भाव कमी होऊन ही वाढीव भावाचे फलक तसेच दुकानासमोर लटकावेलेले दिसत आहेत,या बाबत काही दुकानदारा सोबत चर्चा केली असता ते म्हणतात की 3% जी एस टी लागून आहे , असी चर्चा आहे की 90% माल 0 मधे येतो mag 100% मालावर जी एस टी कोठे भरली जाते अशी चर्चा ग्राहक करत आहेत,या व्यापाऱ्यांना कोण्या जी एस टी अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा तर नाही ना हा प्रश्न अनेकांना पडला असून ही ग्राहकाची लूट कोण थांबवणार असा ही प्रश्न सामान्य ग्राहकास पडला आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
