उदगीर चे शिक्षण महर्षी बापुराव राठोड वर 420 चा गून्हा दाखल! उदगीर:- उदगीर येथील शिक्षण महर्षी म्हणून वावरणारे, गुनाई शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख तथा पूर्व जिल्हा परिषद सदस्य बापुराव शंकरराव राठोड यांच्यावर गुरनं 249/23 क 420,465,467,468,471 भादवि ने गुन्हा दाखल झाल्याने राजकिय शेत्रात तथा शिक्षण शेत्रात भूकंप झाल्याचे चित्र दिसत आहे फिर्यादी बाळासाहेब नारायण राठोड वय 39वर्षे धंदा शिक्षक रा कौळखेड ता उदगीर यानी उदगीर शहर पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून बापूराव शंकरराव राठोड रा कौळखेड ता उदगीर या आरोपीने दि.06/11/2017 ते अदयापर्यंत सर्वे नं.220 न.प.न.2-2-2049 मधिल 60 आर क्षेत्र हे फिर्यादीचे व नमुद आरोपीचे दोघात सामाईक असुन त्याची वाटणी झाली नसताना देखील आरोपीने पुर्ण 60 आर क्षेत्रावर मालकी हक्क दाखवुन व नगर परिषदेचा खोटाबनावट 8-अ जोडुन तो खरा आहे असे भासवुन त्याआधारे लिव्ह अॅन्ड लायसन्स करारपत्राची सह दुय्यम निबंधक कार्यालय उदगीर येथे दस्त नोदंणी करुन घेवुन त्याआधारे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातुर यांच्याकडुन गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक आश्रमशाळा बोरतळा पाटी उदगीर व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या ईमारतीचे भाडे मुल्याकंन करुन घेवुन त्याचा लाभ घेवुन त्यांनी सामाईक क्षेत्रामध्ये फिर्यादीचा हिस्सा असताना देखील फिर्यादीस त्यापासुन वंचित ठेवुन फिर्यादीची व शासनाची आर्थिक फसवणुक केली आहे .वगैरे मजकुर फिर्याद वरून मा पो नि सो यांचे आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास स पो नि श्री कुदळे यांचे कडे देण्यात आला असल्याने एकच भूकंप झाल्याचे चित्र दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी