पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा विविध मागनीसाठी धडक मोर्चा...बेमुदत संपाचा नववा दिवस उदगीर= महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कायद्यामध्ये बदल करून नवीन खासगी कॉलेजांना मान्यता देण्याचा निर्णया सह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाला प्रारंभ केला आहे. आज या आंदोलनाचा नववा दिवस होता. पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर येथील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले असून अत्यंत तातडीच्या सेवांव्यतिरिक्त इतर सर्व सेवा व कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या सरकार आणि विद्यापीठाने नवा डिप्लोमा सुरू करू नये. पशुवैद्यकीय श्रेणी - २ दवाखान्यांचे रुपांतर श्रेणी -१ मध्ये करुन पदवीधर विद्यार्थ्यांची तेथे नियुक्ती करावी. खासगी पशुवैद्यकीय कॉलेज सुरू करू नये. या मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. शासनाने व प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी यासाठी आज उदगीर शहरातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचा शेवट हा मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आला. जोपर्यंत राज्य सरकार या मागण्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विदयार्थी संघटनेने दिलेला आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
