पत्रकार भवन निर्मिति कृती समितीच्या निमंत्रक पदी युवराज धोतरे यांची सर्वानुमते निवड उदगीर= उदगीर येथे पत्रकार भवन व्हावे म्हणून येथील पत्रकाराची अनेक वर्षंपासूनची मागणी असतानाही जागा उपलब्ध नसल्याने पत्रकार भवन काही होत नाही , निवडणूक आली की सर्व पक्ष आम्ही पत्रकार भवन बांधून देऊ अशी आश्वासने देतात , निवडणूक झाली की पत्रकारात गट निर्माण करून आपली पोळी भाजून घेतात, आता येथील सर्व पत्रकार एक येऊन पत्रकार भवन निर्माण कृती समिती स्थापन केली असून या समितीच्या निमंत्रक पदी येथील कर्मठ, दबंग पत्रकार युवराज धोतरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांचा हतोटा पाहता आता पत्रकार भवन निर्मिति चा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

