उदगीर ची दूध डेरी, सरकार चालऊ शकत नाही:- दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील 👉 आता डेरी चा प्रश्न केंद्राच्या दरबारात उदगीर:- डेरी बचाव शिष्ट मंडळास उदगीर चे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी मुंबई येथे बोलाऊन महाराष्ट्राचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या सोबत येथील डेरी महाराष्ट्र शासनाचे चालु करावी म्हणून भेट घडविली असता दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यानी स्पष्ट सांगितले की ही डेरी शासन कुठल्याही परिस्थितीत चालु करू शकत नाही असे शिष्ट मंडळ प्रमुख अजित शिंदे यांनी फेसबूक लाईव्ह करून सांगितले असून आता या डेरी संधरबात पुढील आठवड्यात केंद्रीय दुग्ध विकास मंत्री पुरषोत्तम रूपाला यांची अणि नॅशनल डेरी विकास बोर्डा सोबत बैठक होणार असल्याचे ही अजित शिंदे यांनी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
