भाऊ आता एकच काम शिल्लक, नप मुख्याधिकारी बदला! उदगीर:- उदगीर तालुक्याचे भाग्य असे की आपल्यासारखा नेता आमदार या मतदार संघास भेटला, अपली दिव्य दृष्टी , मतदार संघाचा विकास करण्यासाठी आपण रात्रीचा दिवस करून विकासाचा महामेरू आपण मतदार संघात चालवत आहात, आपले गुणगान करावे तेवढे कमी आहे, भाउ आपली दिव्य दृष्टी उदगीर चा विकास जोराने व्हावा या साठी तेथील अधिकारी हे कर्तव्यदक्ष पाहिजे म्हणून आपण उदगीर नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून शुभम क्यातामवर याना अनलात,खरेच हे मुख्याधिकारी एवढे कार्यक्षम आहेत की त्याचे गुण गौरव पत्रकारानी करावी एवढी आमची लेखणी उज्वल नाही,भाउ मुख्याधिकारी क्यातमवार यांच्या कार्यकाळात उदगीर ने फार प्रगती केली आहे, रस्ते चकाचक ,गटारी स्वच्छ, उदगीर अतिक्रमण मुक्त,ग्रीन झोन पूर्ण मुक्त या मुळे उदगीर जिल्हा होणार यात काही शंका नाही, जिल्हा जेंव्हा होईल तेंव्हा पाहू पण आपण दिव्य दृष्टी ठेवून मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लावलात या बद्दल धन्यवाद, आता उदगीर शहरात काही थोडे काम असेल ते तुम्ही पूर्ण करणारं त्या मुळे आता नप मुख्याधिकारी क्यातमवार सारखे कार्यक्षम अधिकारी गडचिरोली अश्या भागात पाठवावे जेने करून तेथील जे काही शिल्लक कामे असतील ते साहेब एक्या चुटकी सरशी करतील आणि उदगीर नगर पालिकेत एक सामान्य जनतेची कामे करणारा, त्यांचा प्रश्नाची जान असणारा साधा अधिकारी येथे आणावा अशी विनंती उदगीर चे सामान्य नागरिक करत असून एवढे एक शिल्लक काम झाल्यास उदगीर शहर सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही
• श्रीनिवास मदनलाल सोनी