उदगीर वकील संघाची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी ॲड. वलांडीकर, सचिवपदी ॲड. हुल्ले उदगीर - येथील वकील संघाची निवडणूक बुधवार दि.२३ ऑगस्ट रोजी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यावेळी अध्यक्षपदी ॲड. बालाजी वलांडीकर (आदेप्पा), उपाध्यक्षपदी ॲड.जगन्नाथ कांबळे, महिला उपाध्यक्षपदी ॲड. रुक्मिणी सोनकांबळे, सचिवपदी ॲड. संजय हुल्ले, सहसचिवपदी ॲड. भगवान पाटील, महिला सहसचिवपदी ॲड. अश्विनी कुलकर्णी, कोषाध्यक्षपदी ॲड. मारोती चव्हाण, ग्रंथालय सचिवपदी ॲड. राजकुमार मुंढे, महिला प्रतिनिधीपदी ॲड. अख्तारबानू शेख आदींची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ विधीज्ञ ॲड. गुलाब पटवारी, ॲड. एस. टी. पाटील, ॲड. प्रभाकर काळे, ॲड. व्ही. एन. औरादे, ॲड. रमाकांत पाटील, ॲड. काशिनाथ तोबरे, ॲड. उन्मेष हिबारे, ॲड. बालाजी पाटील, ॲड. नारायण पाटील, ॲड. अशोक भोसले, ॲड. लक्ष्मीकांत मध्वरे, ॲड. बालाजी कारभारी, ॲड. विजय दिक्षीत, ॲड. सचिन कुलकर्णी, ॲड.विक्रम संकाये, ॲड.गितानंद अक्कनगिरे व मावळते अध्यक्ष ॲड. बाळासाहेब नवटक्के आदींनी प्रयत्न केले. गेल्या अनेक वर्षांनंतर उदगीर वकील संघाची ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे न्यायालय परिसरात सत्कार करण्यात येवून शुभेच्छा देण्यात आले. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. महेश माशाळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. शरद पाटील, ॲड. संतोष सुर्यवंशी यांनी काम पाहिले. नूतन पदाधिका-यांची सर्वत्र अभिनंदन होत आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
