विनाकारण वृक्ष तोड, कुठे गेले एक झाड लावून फोटो काढणारे? 👉 उदगीर शहरातील झाडे तोडून शहर बकाल करणाऱ्या स्वयं घोषित एक्या पक्ष्यांच्या त्या कार्यकर्त्याला कोणाचे अभय उदगीर:- उदगीर येथील तसील कार्यालय परिसरातील मोठे मोठे वृक्ष कुठेच अडचण करत नसताना विनाकारण ही वृक्ष तोड केल्याने नागरिक संताप व्यक्त करत असून ,ही वृक्ष तोड कोणाच्या सांगण्यावरून केली,कोण केली यांच्यावर त्वरीत वन विभाग, नगरपालिकेने कार्यवाही करावी अशी मागणी जनता करत आहे
Popular posts
*81 हजार 800 रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त, एक महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल. उदगीर= लातूर शहरातील सूतमिल परिसरात कारवाई करत 81 हजार 800 रुपये किमतीचा 16.36 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्स जप्त. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत असून त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक 22/05/2025 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुतमील परिसरातील एका महिलाच्या घराच्या बाजुस व घरामध्ये इसम नामे 1) ऋषीकेश शेषराव राठोड, वय २८ वर्षे रा. नाथनगर, पवन कॉलनी लातूर. 2) संयम बालाजी पडीले, वय 26 वर्ष रा. बिदर रोड. उदगीर जि. लातूर 3) 35 वर्षीय महिला रा. सुतमील रोड. लातूर. 4) अनुप नवनाथ सोनवणे रा. निगडी, पुणे हा.मु. सुतमील रोड, लातूर (फरार) एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स यांनी अवैध विक्री करणेसाठी अनुप नवनाथ सोनवणे याची पत्नीने अवैध विक्री करणेसाठी स्वतःच्या घरामध्ये बाळगलेले अंमली पदार्थ दोन पिशवीसह एकूण 16.36 ग्रॅम वजनाचा 81,800 रू. किमतीचा अंमली पदार्थ एमडी, गुन्हयात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे 04 मोबाईल, एमडी ड्रग्स वजन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वजन काटा असा एकूण 02 लाख 82 हजार 300 रुपयांचा अमली पदार्थ एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज हस्तगत करण्यात आला आहे. एमडी ड्रग्सची विक्री करताना मिळून आलेले एक महिला व तीन पुरुष अशा चार जणा विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तर फरार आरोपी अनुप सोनवणे याचा शोध सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे आमचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मोहन सुरवसे, नाना भोंग, सचिन दरेकर, मनोज खोसे, गोविंद भोसले, राहुल कांबळे, नितीन कठारे, चंद्रकांत डांगे, बंडू नीटुरे, प्रदीप चोपणे यांनी केली आहे.
Image
साहेबांचा वचक संपला का अधिकाऱ्यांनी ओळखली पोती? 👉 उदगीर तालुक्यातील अधिकारी निर्ढावले,यांच्यावर वचक कोणाचा उदगीर:- तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेरनगरी चालू असून ही या अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणीच आवाज उठवत नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत असून अनेक जण तर साहेबाचा वचक संपला तर काही जण अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखल्याचे बोलताना दिसत आहेत उदगीर तालुक्यातील अनेक कार्यालयात सध्या अंधेर नगरी चौपट राज दिसत असून येथील अधिकारी हे स्वतःस हुकूमशाह सारखे वागताना दिसत आहेत,महसूल विभागाकडे कुठलीही तक्रार करा त्या तक्रारीस कचऱ्याच डब्बा दाखवला जात आहे कारण की या तक्रारीत या विभागाचा कोणी अधिकारी ,कर्मचारी अडकत असल्याने वरिष्ठ त्यास वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असल्याचे दिसून येते,दुसरीकडे नगरपालिकेत सध्या प्रशासक राज्य चालू असून दोन दोन महिने टेंडर फ्लॅश होऊन ही टेंडर सुटत नाही,पुढे पावसाळा असल्याने कामे होतील कसे हे प्रशासक आणि तेथील अधिकाऱ्यांनाच माहित,शहरात अनेक ठिकाणी भूमिगत ड्रेनेज चे काम चालू असून हे काम किती उत्कृष्ट होत आहे हे जाणून घेण्यासाठी उदगीरकर उत्सुक असून ही त्याची माहिती मिळत नसल्याचे दिसते,शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढत असताना नगरपालिकेचा अतिक्रमण हटाव पथक गायब असल्याचे चित्र दिसत आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भिंतीला तडे गेल्याने त्यांचे काम किती उत्कृष्ट झाले याचे प्रमाणपत्र देणे शिल्लक राहिलेले दिसते,तालुक्यातील नवीन निर्मित रस्त्याची वाट लागल्याचे दिसते,शहरात भर चौकात मटका,गल्लीत दारू शहरात अवैध धंद्यांना ऊत आले असतांनाही पोलिस प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे, उदगीर ला आर टी ओ कार्यालय व्हावे अशी उदगीर कराची इच्छा होती ती पूर्ण झाली खरी पण येथील अधिकारी सकाळ संध्याकाळ रिंग रोड,मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडून अवैध वसुली करत असल्याने उदगीर शहरातील व्यापारावर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत, हे सर्व होत असताना साहेब गप्प का बसले आहेत हे जनतेला कळत नाही ,साहेबाची अधिकाऱ्यावरची वचक संपली ? अधिकाऱ्यांनी साहेबाची पोती ओळखली अशी चर्चा नगरपालिकेसमोर जनता करताना दिसत आहे
Image
लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचा महेश गौरव पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना जाहीर 👉 मारवाडी समाजासाठी सतत झटणाऱ्या व्यक्तीस हा विशेष पुरस्कार जिल्हा सभे तर्फे देण्यात येते 👉 5 जून 20250 गुरुवारी दयानंद सभागृह लातूर येथे सदरील पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार उदगीर= उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष तथा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांना मानाचा समजला जाणारा लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चा महेश गौरव पुरस्कार घोषित झाला असून 5 जून 2025 रोजी हा पुरस्कार लातूर येथे मोठ्या थाटात दिला जाणार असल्याचे जिल्हा सभे चे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे लातूर जिल्हा माहेश्वरी सभे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित महेश गौरव पुरस्कार या वर्षी उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास मदनलाल सोनी यांना घोषित झाला असून हा पुरस्कार मारवाडी समाजासाठी विशेष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो,श्रीनिवास सोनी यांनी येथील मारवाडी समाजाच्या स्मशानभूमी साठी शासनाकडून 10 गुंठे जागा सह स्मशानभूमी विकासासाठी 30 लाख रुपयाचा निधी ही आमदार संजय बनसोडे यांच्या कडून उपलब्ध करून घेतले तसेच मारवाडी समाजातील गरीब कुटुंबास मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देणे,समाजासाठी विविध योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणे,अशा अनेक समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आल्याचे लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे सचिव फुलचंद काबरा यांनी सांगितले आहे,हा पुरस्कार श्रीनिवास सोनी यांना घोषित झाल्या बद्दल लातूर जिल्हा माहेश्वरी सभे चे अध्यक्ष प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा,उदगीर येथील प्रसिद्ध समाजसेवक महेश भूषण डॉ रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, गोविंदलाल राठी,कैलास बियाणी अशोक बाहेती , जगदीश बागडी, रामविलास नावंदर,विनोदकुमार टवानी, डॉ रामेश्वर बाहेती,उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे सचिव राजगोपाल मणियार,आनंद बजाज, डॉ प्रवीण मुंदडा,राधेश्याम इनानी,द्वारकादास भुतडा,शिरीष नावंदर,राजेश सारडा ,सत्यनारायण सोमाणी, गणेश बजाज,मारवाडी युवा मंच अध्यक्ष गोविंद मुंदडा,लक्ष्मीकांत सोमाणी,पवन मुंदडा सह उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे सचिव सुनील हवा सह सर्व समाज प्रेमी यांनी सोनी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या
Image
उदगीर शहर परिसरात मटक्याच्या सुळसुळाट,अनेक परिवार उध्वस्त? 👉 जिल्ह्यात अवैध धंद्याचा नायनाट म्हणणारा पोलिस विभाग मूग गिळून गप्प ? उदगीर:- उदगीर शहर व परिसरात सध्या अवैध धंद्याचे बस्तान असून ही पोलिस विभाग मूग गिळून गप्प असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र असून मटक्याने तर कहरच केले असून गल्ली बोळात राजरोस मटका चालू असल्याचे चित्र दिसत आहे उदगीर शहर एक ऐतिहासिक ,शैक्षणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे पण मागील काही दिवसापासून शहर व परिसरात अवैध धंद्याचे बस्तान बसले असून शिवाजी चौक,बस स्टँड समोर खुलेआम मटका घेतला जात असताना अवैध धंदे जिल्ह्यात चालणार नाही अशी वल्गना करणारे आता गप्प का झाले ,कोणत्या मटकेवाल्यान यांना मॅनेज केले ही चर्चा शहरात जोरात चालू आहे,एकीकडे शहरातील कुठल्याच अधिकाऱ्यावर कोणाचेही अंकुश नसल्याचे चित्र दिसत असून शहरात रेती माफिये,मटका माफियांचे राज्य सुरू झाले का हा प्रश्न सामान्यांना पडत असून सध्या शहरातील अनेक कार्यालयात दलालांचे राज्य असल्याचीही चर्चा असून या अशा बाबींमुळे उदगीर शहराचे नाव बदनाम होत असून या अवैध धंद्यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे
Image
राठीज क्लासेस तर्फे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न उदगीर= येथील संतोष राठी यांचे प्रसिद्ध राठीज क्लासेस तर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव विशाल बहात्तरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन, उदगीर,डॉ. राजकुमार प्रेमसुखं नावंदर प्राचार्य, संत तुकाराम लॉ कॉलेज, उदगीर,प्रा. ऍड. दिप्ती राजकुमार नावंदर, संत तुकाराम लॉ कॉलेज, उदगीर,श्रीनिवास सोनी,वरिष्ठ पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आला,यात खुशी गोविंद ईनाणी - 97.4 %,वैष्णवी गुडाळे 95.4 %, राघव मणियार 94.2 %,पीयूष गुप्ता -93 %,प्रतीक बेंद्रे - 90% ,हर्षद वाडेकर - 89%, ऋतुजा बेडके - 89 %,सौरुद्र नागरगोजे - 89 %,सुयश कल्लूरकर - 89%,जान्हवी बिरादार - 87%,साईनाथ पदमवार - 85.2,सुयश बिरादार - 85.2%,अंकिता स्वामी 85,ऋचा मोदानी - 84%,भार्गव मसगले - 83 %, शरयू कौठाळे - 82 %,नागेश चांडके -82 %,प्रथमेश बेलकोने - 81% ,अनुश्री उद्तेवार - 80 %,सुमेध बोंद्रे - 81%,प्राची वाघमारे - 81%,दिव्या हैबतपुरे - 80%, अथर्व बिरादार - 80.2 %,अथर्व शेटकार- 81%,दीक्षा रणदिवे - 79.80 %,दीक्षा हैबतपुरे - 77%,पिंजारी महबूब - 76.70,प्रणव बेंद्रे - 81.40,श्रेयस माने - 77 या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले या वेळेस पोलिस निरीक्षक बारहत्ते यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाची मान उंचावेल असे काम करावे,प्रशासकीय सेवेत यावे, ॲड डॉ राजकुमार नावंदर यांनी दहावी नंतर पुढे कोणकोणते क्षेत्र आहेत याची माहिती दिली तर पत्रकार श्रीनिवास सोनी यांनी पालकांनी आपल्या मुलाची आवड जाणून त्या क्षेत्रात पाठवावे ,विनाकारण पाल्यावर डॉक्टर, इंजिनियर हो म्हणून दबाव घालू नये असे अनेक क्षेत्र आहेत की ज्यात उज्वल यश कीर्ती मिळते,प्रास्ताविक सौ राठी यांनी केले पालकांनीही राठी क्लासेस चे आभार मानले
Image