उदगीरात मटका जोरात,ओपन जेऊ देईना, क्लोज झोपू देईना! 👉:- उदगीर बनले मटक्याचे माहेर ? उदगीर:- उदगीरात सध्या मटका जोरात असून अनेक चौका चौकात खुलेआम मटका लावला जात असून या मुळे अनेक गरिबाचे कुटुंब उध्वस्त होत आहेत उदगीरात सध्या कर्तव्यदक्ष अधिकारी आल्याने दोन नंबर चे धंदे बंद होतील ही अपेक्षा असताना काही दिवस हे धंदे बंद करून परत जोमाने सुरू होण्याचे कारण न समजण्या इतके उदगीर कर वेडे नाहीत,कारण की शहरात चौका चौकात खुलेआम मटका चालवला जात आहे, खुले आम् वेश्यां व्यवसाय सुरू आहेत,दारु बद्दल तर बोलणेच नको कारण की दारूबंदी अधिकारी कोण आहे हे पत्रकारांनाही माहीत नाही, ते कधी येतात कुठे तांड्यावर कार्यवाही करतात एक दोन जवळच्याना फोटो बातमी देउन आपली पाठ थोपटून घेतात पण शहरातील उमा चौक बाजूस , शिवाजी महाराज चौक बाजूस तर बस स्थानका समोर ज्या ठिकाणी सामान्य जनतेची वर्दळ असते तेथे खुलेआम मटका चालवला जात असल्याने अनेक गरीब मजुरी करणाऱ्यांचे कुटुंब उध्वस्त होत असतानाही कर्तव्य दक्ष अधिकारी गप्प का अशी चर्चा शहरात चालु असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी