डेरी बचाव कृती समिती कडून ना. संजय बनसोडे यांचे खच्चिकरण करण्याचा प्रयत्न? :- ज्या ना. संजय बनसोडे यांनी कृती समितीच्या सदस्यांना मुंबई ला बोलाऊन डेरी चालु करण्यासाठीं दुग्ध विकास मंत्र्याची भेट घालून दिली त्यांनाच बाजूला सारून दिल्ली गाठण्याचे कृती समितीचे उद्देश काय? 👉 मंत्री महोदयांनी कृती समितीच्या सदस्यांना दिल्ली जाऊ , जेथे जेथे जावे लागले तेथे मी घेऊन जातो सांगितल्या नंतर ही कृती समिती अशी का वागली याची शहरात उलट सुलट चर्चा उदगीर:- उदगीर येथील शासकिय दूध डेरी शासनाचे सुरू करावी म्हणून उदगीरकराची अनेक दिवसाची मागणी लक्ष्यात घेऊन उदगीर चे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील याना भेटून विनंती केली पण ही डेरी शासन कुठल्याही परिस्थितीत चालु करू शकत नसल्याचे सांगितल्याने त्यांनी ही डेरी अमुल ने चालवावी म्हणून प्रयत्न सुरू करताच खाजगी डेरी चालविण्यास विरोध उभा राहिला,हा विरोध दाखवण्या साठी स्वयंघोषित डेरी बचाव कृती समिती(या समितित किती सदस्याना डेरी ची पूर्ण माहिती आहे हे त्यानाच माहित) स्थापन झाली, त्यातिल काही नी याची माहिती मंत्री महोदयाना दिली, मंत्री महोदयानी या कृति समितिशी चर्चे साठी शिवाजी महाविद्यालयात बैठक बोलावली, त्या बैठकीत मंत्र्यांनी कृती समितीच्या सदस्यांनी मुंबई यावे, तेथे काही नाही झाल्यास मी तुमच्या सोबत दिल्ली येऊन प्रयत्न करतो म्हणाले,मी सोबत येऊन दुग्ध विकास मंत्र्याशी भेट घालून देतो म्हणाले त्या प्रमाणे कृती समितीचे काही सदस्य मुंबई गेले, दुग्ध विकास मंत्र्याची भेट घेतली अणि मंत्रालय परिसरातून फेस बुक लाईव्ह करत ही डेरी शासन कुठल्याही परिस्थितीत चालु करू शकत नसल्याचे सांगितले,या नंतर या कृती समितीचे अणि मंत्री महोदयांचे कुठे बिनसले हे समजण्या आधी कृती समितीचे सदस्य खासदाराना घेऊन दिल्ली दरबारी नितीन गडकरी याची भेट घेऊन डेरी बचाव ची मागणी त्यांचाकडे केली असून आता पुढे काय होईल हे पाहावे लागेल पण कार्यक्षम, धडाडीचे, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या सोबत जाणे अणि पुढील काळात त्यांना डावलने हे कृती समितीस किती परवडेल अशी चर्चा शिवाजी चौकात चालु असल्याचे दिसते
• श्रीनिवास मदनलाल सोनी