पत्रकाराच्या रस्ता रोको ने उदगीर ठप्प! उदगीर:- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ, गुण्डाकडून अमानुष मारहाण करावयास लावणारे आमदार किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर पत्रकार सौरक्षन कायद्याने गुन्हा दाखल करावा या साठी उदगीर तालुक्यातील सर्व पत्रकारानी येथील शिवाजी महाराज चौकात भूतो न भविष्यती असे रस्ता रोको केल्याने उदगीर ठप्प झाल्याचे चित्र दिसत होते, या आंदोलनात पत्रकाराची एकी पाहून पत्रकारात फूट पाडणाऱ्याचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसत होते, जर या आमदारावर कारवाई नाही झाल्यास या पेक्षा ही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे उपस्थित पत्रकारानी सांगितले,या नंतर कार्यवाही चे निवेदन उपजिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी विनायक चाकुरे, रोशन मुल्ला, अर्जुन जाधव, युवराज धोतरे ,राम मोतीपवळ, सचिन शिवशेट्टे, रवींद्र हसरगुंडे, दयानंद बिरादार, डॉ धनाजी कुमठेकर, संतोष जोशी, राजीव किनीकर, श्रीनिवास सोनी, विनोद उगीले, सिद्धार्थ सूर्यवंशी, बिभीशन मद्येवाड, महादेव आनवले, बबन कांबळे, सुनील हावा, बस्वेश्वर डावळे, अशोक कांबळे, बालाजी कवठेकर, राजकुमार नावंदर, ॲड.गोविंद सोनी, महेश मठपती, भगवान सगर, मंगेश सूर्यवंशी, मनोहर लोहारे, अविनाश सूर्यवंशी, संदीप निडवदे, जावेद शेख, संगम पटवारी, जीवन भोसले, दत्तात्रय भोसले, गंगाधर भेंडेगावकर, नितीन एकुर्केकर, श्रीकृष्ण चव्हाण, राम जाधव, विश्वनाथ गायकवाड, संग्राम पवार, ॲड. डॉ. श्रवणकुमार माने, अनिल जाधव, माधव घोणे, अशोक तोंडारे, लक्ष्मण रणदिवे, जय मादळे, अझरुद्दीन शेख, संदीप पाटील, सुधाकर नाईक, बसवराज बिरादार, गणेश मुंडे, ईश्वर सूर्यवंशी, सुरेश पाटील नेत्रगांवकर आदी सह अनेक पत्रकार उपस्थीत होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी


