नीता मोरे रोटरीच्या पुरस्काराने सन्मानित उदगीर:- येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या सहशिक्षिका नीता मोहनराव मोरे यांना रोटरी क्लब उदगीरच्या ' नेशन बिल्डर अवार्ड ' ने सन्मानित करण्यात आले. रघूकुल मंगल कार्यालयामधील आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर माधव पाटील उचेकर, रवी बक्कड, सुधीर लातूरे , शशिकांत मोरलावार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रोटरीच्या नूतन अध्यक्षा मंगला विश्वनाथे, सचिव सरस्वती चौधरी, रवी हसरगुंडे, संतोष फुलारी, विजयकुमार पारसेवार, महानंदा सोनटक्के, विशाल तोंडचिरकर, अमोल निडवदे, सुलोचना येरोळकर, पत्रकार विक्रम हालकीकर,मोतीलाल डोईजोडे, विजयकुमार जाधव हे उपस्थित होते. वृक्षारोपण व संवर्धन, प्रवाहा बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, गणित विषयाची प्रदर्शनी, हस्तलिखिते, प्रश्नमंजुषा,भीत्तीपत्रके घेणे. विशाखा समितीमार्फत किशोरवयीन मुलींचे विविध विषयांवर समुपदेशन घडविणे, पाली, वाड्यावरील,रस्त्यावरील,बेघर लोकांना साडी चोळी फराळ वाटप करत त्यांच्यासोबत रक्षाबंधन, दसरा, दिवाळी सारखे सण साजरे करणे. विद्यार्थ्यांचा मेंटॉर बनत त्यांच्या अडचणी सोडवणे. अशा विविध उपक्रमातून त्यांनी आपले कार्य अखंड चालू ठेवले आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल शंकरराव लासुने, मधुकरराव वट्टमवार, सतनप्पा हूरदळे, अंबादास गायकवाड, अंकुश मिरगुडे, संजय कुलकर्णी, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले, कृष्णा मारावार यांनी हार्दिक अभिनंदन केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
