उदगीर उपजिल्हा रुग्णालयात डुकराचा सुळसुळाट, दुर्गंधी ने रुग्ण, नातेवाईक परेशान 👉 रुग्णालय परिसरात डुकरांचा सुळसुळाट, रुग्णालयात दुर्गंधी उदगीर:- उदगीर च्या उपजिल्हा रुग्णालयात सध्या अंधेर नगरी चौपट राज चालु असल्याने रुग्णालयात प्रवेश करताच ऋग्णास भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना नाकास रुमाल लाऊन प्रवेश करावे लागत असून महीला वार्डा समोर त्या बाजूस गल्लीत तर कसे रुग्णाचे नातेवाईक बसत आहेत हे त्यांनाच माहीत,या वार्ड समोरून रुग्णालय प्रमुख,तेथील अधिकारी, डॉक्टर हे अनेक चकरा मारत असून ही ही दुर्गंधी त्यांचा नाकापर्यंत पोहचत नाही किंवा त्यांना त्या दुर्गंधीची सवय झाली हे त्यांनाच माहीत दुसरीकडे शुद्ध पाण्याचा फिल्टर ला डुकरे तोंड लाऊन तेथे वावरत आहेत, दुसरीकडे असे वाटते की या रुग्णालय परिसरात इतके डुकरे आहेत की या रुग्णालयातील कोणी येथे वराह पालन तर केले नाहीं हा प्रश्न सामान्याला पडला असून,या वराह पालन मुळे म्हणा किंवा दुर्गंधी ने आजार नसलेल्या माणसास येथून आजार घेऊन बाहेर पडावे लागत असल्याचे दिसत असून ही या रुग्णालयातील स्वच्छ्ता रामभरोसे दिसत असतानाही रुग्णालय प्रमुख गप्प का बसले आहेत हे त्यांनाच माहीत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

