घाणीचे साम्राज्य , उदगीर कराचे आरोग्य धोक्यात 👉 प्रशासकापेक्षा राजकारण्यांचा कार्यकाळ बरा म्हणण्याची वेळ उदगीर करावर उदगीर= उदगीर नप वर मागील दोन वर्षा पासून प्रशासक कार्यकाळ चालु असून प्रशासक म्हणून उपजिल्हाधिकारी तर मुख्याधिकारी काम पाहत आहेत,या दोन्ही अधिकाऱ्यास जनतेचे काहीच देणे घेने लागत नाही का हा प्रश्न सामान्य माणसाला पडत असून शहरात अनेक भागात गटार तुंबल्या, कचरा रस्त्यावर पडलेला असून ही सफाई कर्मी मन मर्जी ने येतात आपल्या सवडी नुसार कचरा घेतात,शिवाजी सोसायटी, दत्त मंदिर रोड हा उच्यभ्रू वस्ती मानली जाते या भागातील गटारी मागील अनेक महिन्यांपासून काढल्या नसून या गटारी तुंब आहेत, दुसरीकडे घरो घरी गाडी येऊन कचरा गोळा करत होती ती पण मर्जी ने येते,जो कोणी याना चाय पानी देतो त्यांचा कचरा घेतला जातो,मग अनेक जन घरातील कचरा चौकात टाकत असून गाडी वाले चौकाच्या एक बाजू चा कचरा उचलतात तर दुसऱ्या बाजूला असलेला कचरा ते उचलत नाहीत, या सफाई कर्मचाऱ्यावर कोणाचेच अंकुश नसल्यानें हे दिन चले तनखा घट म्हणून वागत असल्याने घानी च्या साम्राज्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत असून प्रशासनानं त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी जनता करत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

