अखेर परमेश्वराने टेकले हात! 👉 उदगीर कराना शिस्त लावण्यासाठी केली पराकाष्ठा पण होंनाऱ्या त्रासाने गप्प बसणेच योग्य समजून टेकले हात उदगीर:- उदगीर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून रस्त्यावरील अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता दिसताच त्यांनी आपण गप्प राहणे उचित समजून त्यांनी गप्प बसल्याने उदगीर कराची शेवटची आश्या ही संपल्याचे दिसत आहे उदगीर शहरातील बेशिस्त अटोवाले, दुकानदारांकडून रस्त्यावर होणारे अतिक्रमण, बस्थानकासमोर ऑटो ची वेवस्थित व्यवस्था करण्याचा पोलिस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी पूर्ण प्रयत्न केला खरा पण राजकारण्याच हस्तक्षेप, सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्याच्या धमक्या, मुजोर व्यापाऱ्याच्या अधिकाऱ्यांसोबत बसून काड्या करणे यास कंटाळून कर्तव्यदक्ष अधिकारी परमेश्वर कदम यांनी आपले हाथ टेकल्याने सामान्य माणसाला रस्त्यावरून चालणे अवघड झाल्याचे दिसत असून जेथे परमेश्वराने हाथ टेकले तेथे आमची काय बिशाद म्हणून उदगीरकर उघड्या डोळ्यांनी पाहून गप्प बसल्याचे चित्र दिसत आहे कारण की आज मितीस सायंकाळी शिवाजी चौक ते दूध डेअरी मुख्य रस्ता (ग्रीन झोन सोडा) , नांदेड बीदर मुख्य रस्ता, पोलिस स्टेशन ते उमा चौक (जाकिर हुसैन चौक),शिवाजी चौक ते कॅप्टन कृष्णकांत चौक या भागात सामान्य माणूस, वरिष्ठ नागरिक, महिला, छोटे मुले हे कसे फिरतात हे न पाहिलेले बरे वाटते पण जेथे परमेश्वराने टेकले हात तेथे आमची काय बिशाद म्हणण्याची वेळ उदगीर करावर आल्याचे दिसते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी