उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी माल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा = सभापती शिवाजीराव हूडे उदगीर= उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यासाठी माल तारण योजनेचा शुभारंभ करत असून या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे सह सर्व संचालक मंडळानी केले आहे उदगीर तालुक्यातील शेतकरी बांधवा साठी कृषि उत्पन्न बाजार समिती, उदगीरच्या वतीने शेतकरी बांधवाना सोयाबीन काढणीच्या हंगामात होणारी भावाची घसरन त्यातून त्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उच्च बाजार भाव मिळण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्याकडे असलेला शेतीमाल लगेच बाजारात न विकता तो बाजार समितीच्या गोदामामध्ये ठेवावा या साठी चालु हंगामात शेतमाल तारण कर्ज योजना चालु करण्यात येत असून सदर योजनेचा उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा , या योजनेत गोडाऊन भाडे राहणार नसून आपले होणारे नुकसान टाळावे असे आवाहन बाजार समितीकडून सभापती शिवाजीराव हुडे, उपसभापती, सर्व संचालक मंडळानी केले आहे, शेतकर्यांनी माल तारण साठी खालील कागदपत्र सोबत ठेवावे असे ही त्यांनी सांगितले आहे 1) या योजनेत शेतमाल (सोयाबीन व तूर ) ठेवल्यास त्वरीत शासनाच्या हमीभावाच्या 75 टक्के ग्रेडींग प्रमाणे 6 टक्के व्याज दराने सहा महीने करीता त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. 2) शेतकरी बंधुनी सोयाबीन व तूर हे स्वच्छ करून वाळवूनच घेवून यावे, ज्यामुळे शेतीमालाची गुणवत्त चांगली राहील. सोयाबीन व तूर शेतीमाल घेवून येताना कलतानी (ज्युट) बारदानामध्येच आणावा जेणे करून मालाची गुणवत्त चांगली राहील. 3) सदर योजनेचा लाभ केवळ 6 महीण्यासाठी आहे. शेतकरी बांधवानी शेतीमाल ठेवण्यासाठी येताना चालु वर्षाचा 7/12 पिकपेऱ्याच्या नोंदीसह, आधारकार्ड व बँक पासबुकच्या छायाकिंत प्रतीसह व १ पासपोर्ट फोटो आणावा असे त्यांनी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
