वटवृक्षाच्या श्रद्धांजली साठी सरसावले उदगीरकर 👉 उद्या 11/10/2023 रोज बुधवारी सायंकाळी 5 वाजता शिवाजी चौक येथे वटवृक्षास श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम उदगीर= मागील काही दिवसांपासून उदगीर शहर व परिसरात अधिकाऱ्याचा कृपेने खुले आम् झाडाची कत्तल होत असून ही प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.मागील हप्त्यात काही वृक्ष प्रेमी नी नप चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शुभम क्यातमवार याना भेटून आपली कैफियत मांडली होती कर्तव्यदक्ष मुख्याधिकाऱ्यानी आता शहरात एक ही झाड सोडा झाडाचा फाटा ही तुटणार नाही आणि ज्यांनी झाडे तोडली त्याची कार्यालयीन तीन दिवसात चौकशी समिती मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे एकीकडे सांगितलं पण दुसरीकडे कुठलेच कारण नसताना पंचायत समिती आवरातील जुने वटवृक्ष तोडण्यात आल्याने वृक्ष संवर्धन प्रेमी नी या वटवृक्षास शिवाजी चौक उदगीर येथे बुधवारी सायंकाळी 5 वाजता श्रद्धांजली अर्पण करण्याचे ठरवले असून या वृक्षास श्रद्धांजली वाहण्यास वृक्ष प्रेमी नी यावें असे आवाहन ही त्यांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
