उपजिल्हा रुग्णालयातील समस्या जाणून घेण्यास गेलेल्या पत्रकार श्रीनिवास सोनी याना अर्वाच्य शिविगाळ करत जीव मारण्याची धमकी 👉उपजिल्हा रुग्णालयातील भांडार प्रमुख राजकुमार मालशेट्वार याचा रुग्णालय प्रमुखा समोर प्रताप उदगीर= येथील उपजिल्हा रुग्णालयातील बातमी साठी माहिती घेण्यास उदगीर समाचार चे संपादक तथा उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद उदगीर चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी हे रुग्णालय प्रमुख डॉ अजय महिंद्रकर यांच्या कडे गेले असता औषध स्टोअर च्या स्टॉक माहिती घेण्यास भंडार प्रमुख राजकुमार मालशेट्वार याना बोलवले असता मालशेट्वार डॉ महिंद्रकर यांच्या दालनात येताच पत्रकार सोनी कडे पाहून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले रुग्णालय प्रमुख डॉ महिंद्रकर यानी त्यांना रोकताच ते याला याच्या घरात घुसून कुटुंबासह खलास करतो म्हणत तेथून निघून गेले,2010 मधे ही या मालशेट्वार ने सोनी वर खोटा गुन्हा दाखल केला होता त्यात मे. न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. परत आज मलशेट्वार ने अर्वाच्य शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी बद्दल राजकुमार मालशेट्वार याच्या विरुद्ध उदगीर शहर पोलिस स्टेशन मध्ये असंधेय अपराध प्रतिवेदन (एनसी) 0354/2023 दाखल केली आहे, उपजिल्हा रुग्णालय प्रमुखांनी ही त्यास मेमो देउन वरिस्टा कडे ही तक्रार केल्याचे रुग्णालय प्रमुख डॉ अजय महिंद्रकर यानी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

