होटल राजवाड़ा ची तोड़ फोड़, दोघा विरुद्ध गून्हा दाखल उदगीर =पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अप्पाराव पाटील चौकातील राजवाडा हॉटेल मध्ये दोघा आरोपीने 26 ऑक्टोबर रोजी रात्री जेवणाची मागणी केली असता फिर्यादीने हॉटेल बंद झाले आहे जेवण बंद आहे असे म्हणाले असता यातील आरोपी गौतम किवंडे,राहुल कांबळे यांनी संगनमत करून फिर्यादी जेवण करत असलेल्या टेबलास लाथ मारून खिडकीचा काच फोडून काउंटरवरील कम्प्युटरची तोडफोड करून नुकसान केले.तसेच फिर्यादीच्या डोक्यात बीयरच्या बाटल्या फोडून फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करून गंभीर जखमी करून काउंटर मधील 30 हजार रुपये घेऊन गेले असी फिर्याद बाजीराव शंकरराव पाटोदे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरुन आरोपी गौतम किवंडे,राहुल कांबळे यांच्यावर गुरंन 624/23 कलम 329,323,504,506,427,34 भादवी प्रमाणे 27 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते यांच्याकडे देण्यात आला आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
