3000 रू लाचेत अडकले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,क्लार्क, खाजगी इसम उदगीर= लातूर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग 1 विजय चिंतामण भोये वय 46 वर्षे 2). प्रमोद उत्तम सोनसाळी वय 44 वर्षे, धंदा नोकरी, पद कनिष्ठ लिपिक, प्रादेशिक परिवहन विभाग, लातूर, 3) जिलानी मेहबूब शेख, वय 49 वर्षे, पद खाजगी इसम (एजंट), रा. इंडिया नगर अमन कॉलनी, लातूर यानी 3000 रू लाच घेण्याच्या प्रकरणात यांच्या विरूध्द कलम 7, 7 अ, 12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्स चा व्यवसाय असून त्यांची 'ना वापर' प्रकारात असलेली एक ट्रॅव्हल्स गाडी 'वापर' प्रकारात आणून त्यावरचा टॅक्स वाढविण्यासाठी आलोसे क 1 विजय भोये यांनी सुरुवातीस 5000 /- रुपयेची व तडजोडी अंती 3000 /- रुपयेची पंचासमक्ष लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम आलोसे क 2 प्रमोद उत्तम सोनसाळी, लिपीक प्रादेशिक परिवहन विभाग, वर्ग 3, लातूर यांच्या कडुन स्विकारण्याचे कबुल केले. सदरची लाचेची रक्कम 3000 /- रुपये आलोसे क 2 प्रमोद उत्तम सोनसाळी, लिपीक प्रादेशिक परिवहन विभाग, लातूर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर येथे पंचासमक्ष स्वतः स्विकारली. लाच रक्कम रक्कम स्विकारण्यासाठी आलोसे क 3 जिलानी मेहबूब शेख, खाजगी इसम यांनी प्रोत्साहन दिले आहे. सर्व आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. वरील प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे घटक यांचे कडुन झालेल्या सापळा कारवाई वरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर घटकाच्या दोन पथकानी लागलीच वरील दोन आरोपी लोकसेवकांच्या घरी छापे टाकुन घरझडती केली असता घरझडती दरम्यान काही एक संशयीत रक्कम अथवा दस्ताऐवज आढळुन आलेली नाही. वरील प्रमाणे झालेल्या सापळा कारवाई वरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे गुरन 615/ 2023 कलम 7, 7 अ, 12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक लातूर हे करत आहेत,या कार्यालयात भ्रष्टाचार फार वाढला होता, सामान्य नागरिकाचे काम पैसे दिल्या शिवाय होत न्हवते असी चर्चा जोरात सुरु होती
• श्रीनिवास मदनलाल सोनी