मा. आमदार सुधाकर भालेराव यांचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे वर गंभीर आरोप! 👉:- गुत्तेदार, अधिकारी, आपला खिसा भरण्यासाठी तिरू वरील बंधारे 👉:- ज्या बंधारा दुरुस्ती साठी 5 लाख लागतात तेथे 22 करोड, कोणाचे घर भरण्यासाठी 👉 जेथे मी माझ्या काळात 95 लाखात दगडी बंधरा बांधला त्याच्या दुरूस्ती नावाखाली 22 करोड उदगीर:- उदगीर भाजपा चे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन उदगीर चे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार तथा क्रिडा युवक व बंदरे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे वर गंभीर आरोप केला असून आता भालेराव यांच्या आरोपाला संजय बनसोडे काय उत्तर देणार हे पाहावे लागेल उदगीर, जळकोट तालुक्यातून वाहणाऱ्या तिरु नदीवरील बरेजेस चा मुद्दा घेऊन भाजपा चे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे वर गंभीर आरोप केले असून या बॅरजेस च्या माध्यमातून संजय बनसोड यांनी गुत्तेदार, अधिकारी सोबत स्वतःचे घर करोडो न भरून घेतले असून जेथे माझ्या काळात 95 लाखा मधे दगडी बंधारा बांधला त्याच्या दुरूस्ती नावाखाली 22 कोटी रुपयाची उधळपट्टी केली आहे, दुसरे 7 ब्यारेजेश साठी 116 करोड 36 लाख रुपये निधी खर्च केला असून दोन दोन किलोमीटर वर ऑटोमॅटिक बंधारे जेथे तेवढा पाणी साठा नाहीं (जेथे पाणी साठा होऊ शकत नाहीं)तेथे केले असून या नदीच्या उगमपासून ते जळकोट तालुक्या पर्यन्त जरी बंधारे बांधले तरी ही रक्कम खर्च होणारी नसून अधिकारी , गुत्तेदार आणि नेत्यांनी ही जाणीव पूर्वक केलेला कारनामा असून याची चौकशी होने जरुरी आहे आणि या लुटीत कोन कोन शामिल आहेत हे बाहेर येणे जरुरी असल्याचे ही भालेराव म्हणाले असून आता या आरोपावर कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे काय उत्तर देणार हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
