पत्रकारांला धमकी देणाऱ्या मालशेटवार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करत, निलंबित करा:- मनसे जिल्लाध्यक्ष संजय राठोड उदगीर :- पत्रकार श्रीनिवास सोनी यांना शासकीय सामान्य रुग्णालयातील औषध निर्माण आधिकारी राजकुमार मालशेट्वार यांनी आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुण जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुण निलंबीत करावे यामागची संदर्भात मनसेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र शासनाचे अधिस्विकृती धारक पञकार , साप्ताहिक उदगीर समाचार चे संपादक श्रीनिवास मदनलाल सोनी हे दि .5/10/2023 शुक्रवारी रोजी सामान्य रुग्णालयात असलेल्या उपलब्ध औषध साठ्याची माहीती घेण्यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ए.बि. महिंद्रकर यांच्या दालनात पुर्व परवानगी घेवुन गेले असता त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ माहीती उपलब्ध नसल्याने संबधीत औषध निर्माण आधिकारी आर. डी. मालशेट्वार यांना दालनात ओषध साठा नोंदवही घेवुन येण्यास आदेशित केले होते. त्यांनी दालनात आल्यानंतर पञकारास काय माहीती पाहीजे हे जानुण घेण्या आगोदरच अधिक्षका समोरच आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. नुकत्याच नांदेड येथे झालेली घटना ताजी असताना तिन राज्यातील सिमेवर असलेल्या उदगीरच्या रुण्नालयाती औषधसाठा उपलब्ध ते बाबद आढावा घेवुन बातमी प्रकाशित करण्यासाठी लोकशाहीचा चौथाखांब म्हणुन वृतसंकलनाचे कर्तव्य पार पाडत असताना सर्वसामान्य रुग्णाची हेळसांड होवु नये. या उदात्य हेतुने गेलेल्या जेष्ट पञकारास आशा मग्रुर उधट कर्मचार्याकडुन झालेला प्रकार निंदनीय असुन याचा आम्ही पञकार जाहीर निषेध व्यक्त करतो. तरी मे.साहेबांनी सबंधीत कर्मचार्या विरोधात २०१९ च्या महाराष्ट्र अधिनियन क्रमांक २९ नुसार पञकार संरक्षण कायद्या नुसार गुन्हा नोंद करुन तात्काळ निलंबित करण्यास सबंधित विभागास आदेशीत करण्यात यावे. अन्यथा आम्हास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष संतोष भोपळे , विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रामदास तेलंगे , शहर उपाध्यक्ष सचिन नागपूर्ण, सुनील बिरादार दीपक सदानंदे आदी उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
