श्रावणबाळ, संजयगांधी योजनेच्या 922 लाभार्त्याना मंजुरी:- तहसीलदार रामेश्र्वर गोरे उदगीर:- उदगीर तालुक्याचे भाग्य विधाते क्रिडा युवक बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या सुचानेने, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उदगीर चे कर्तव्यदक्ष तहसीलदार रामेश्र्वर गोरे यांच्या अधक्षते खाली संजय गांधी निराधार समितीची बैठक आज बुधवार 4 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात घेण्यात आली यात संजय गांधी निराधार योजना ( अपंग,विधवा, परितक्त्या, अंतर्भूत पिडीत आजार इ.) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत त्यात श्रावणबाळ 816, संजय गांधी निराधार योजनेच्या 106 अश्या 922 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याचे तहसीलदार रामेश्र्वर गोरे यांनी सांगितले या बैठकीस तहसीलदार रामेश्र्वर गोरे, मुख्याधिकारी नगरपालिका, गट विकास अधिकारी पंचायत समिती,संतोष धाराशिवकर नायब तहसीलदार संगायो , सय्यद कौसर अली अव्वल कारकून महसूल, सौ. तिडके यु पी अव्वल कारकून संगायो, समाधान कांबळे आय टी असिस्टंट उपस्थीत होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
