मंत्री महोदय करतात वृक्षारोपण, अझहर करतो वृक्षाची कत्तल ? 👉 वृक्ष लागवडीचे फोटो काढून समाज माध्यमावर फोटो घालणारे वृक्षप्रेमी मूग गिळून गप्प ? 👉 ज्या झाडाची बिल्डिंग ला अडचण तीच झाडे तोडण्याची परवानगी, अन्य नाही :- सां. बा. अधिकारी देवकर उदगीर:- उदगीर तालुक्यात सध्या वृक्ष तोड जोरात चालू असून एकीकडे उदगीर चे विकास पुरूष कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे अनेक ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत तर दुसरीकडे अझहर नावाचा कार्यकर्ता तालुक्यातील झाडे तोडून शहर व तालुका बकाल करत असताना यास कोणाचे अभय आहे है समजत नाही उदगीर तसील व उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम पुर्ण होत असून या परिसरातील वास्तुला येथील भव्य झाडे कुठलीच अडचण करत नसताना ही झाडे तोडून टाकली आहेत,येथील झाडे तोडणाऱ्यास विचारले असता अझहर च्या आदेशाने झाडे तोडत असल्याचं त्यांनी सांगितले, या अझहर ने संपूर्ण उदगीर तालुका झाडे तोडून बकाल केले असून एकीकडे मंत्री महोदय वृक्षारोपण करत आहेत तर दुसरीकडे अझहर वृक्ष खुलेआम तोडत असून ही तालुक्यांतील वृक्ष प्रेमी म्हणून मिरवणारे मूग गिळून गप्प असल्याने अझहर चे वृक्ष तोड दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

