शेतकऱ्यांच्या हितासाठी, व्यापार वाढसाठी सर्वानी प्रयत्न करावेत कृ.उ.बा.स.सभापती शिवाजीराव हुडे उदगीर= शेतकऱ्याच्या हितासाठी सोबत शेतकऱ्यांचा माल उदगीर बाजार पेठेत आणण्यासाठी बाजार समितीचे संचालक , सर्व आडते ,खरेदीदार सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे असे मत आडत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याला उत्तर देताना बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे म्हणाले आडत वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी रघकुल मंगल कार्यालयात नुतन संचालक मंडळाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार हे होते तर व्यापीठावर सत्कारमुर्ती सभापती शिवाजीराव हुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, नानेश्वर पाटील, विजयकुमार निटुरे, मधुकर एकुर्केकर, संतोष बिरादार, जगदीशप्रसाद बाहेती, गौतम पिंपरे, बालाजी देवकत्ते ,जिवन पाटील, रवींद्र कोरे , बाजार समितीचे सचिव प्रदीप पाटील, असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवशंकर बिरादार, साईनाथ कल्याणे सचिव मनोहर बिरादार हे होते.यावेळी असोसिएशनच्या वतीने बाजार समितीच्या सभापतीसह सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी कल्याण पाटील, शिवाजीराव मुळे, नानेश्वर पाटील, मधुकर एकुरेगकर , विजय निटुरे, सदस्य प्रमोद पाटील,ई आपले विचार व्यक्त केले. या सत्कार समारंभास उद्देशून बोलताना शिवाजीराव हुडे म्हणाले की हा सत्कार माझा नसुन शेतकरी ,व्यापारी मतदारांचा व पक्षश्रेष्ठींचा आहे. शेतकऱ्यांचा हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल ते मी सर्वांना सोबत घेऊन घेईन, आपण सर्वजण मिळून आपल्या समोर चांगला दृष्टीकोन ठेऊन काम करू यावेळी, अशोक बाहेती,राजेश अबंरखाने, सुदर्शन मुंडे, शिवकुमार गुळंगे,सागर महाजन, माधवराव कल्याणे, बाबुराव पांढरे, मलिकर्जून लंजवाडकर लक्ष्मीकांत चिकटवार, शांतीवीर मुळे, सतीश बिरादार, आप्पासाहेब पाटील, गुरुनाथ बिरादार, बालाजी बिरादार, मलीकार्जून काळगापुरे,यांच्यासह आडत व्यापारी, खरेदीदार, दाळमील असोसिएशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशन अध्यक्ष श्रीधर बिरादार, सूत्रसंचालन सहसचिव नागेश आंबेगावे यांनी तर आभार शिवाजी पेठे यांनी मांडले.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार, उपाध्यक्ष शिवशंकर बिरादार, साईनाथ कल्याणे, सचिव मनोहर बिरादार, सहसचिव नागेश आंबेगावे, कोषाध्यक्ष चंद्रकांत बिरादार, सह कोष्याध्यक्ष भरत दंडीमे, सदस्य सुनील पाटील, उमाकांत पांढरे, दिलीप जाधव, श्याम बिरादार, मारोतीराव कडेवार, शिवाजी पेठे, अरविंद जिरगे, मलीकार्जून रेगुडे, निलेश कालाणी, प्रमोद पाटील, संजय बिरादार, दत्तात्रय जगळपुरे, कमलाकर भंडे, चंद्रकांत बिरादार यानी मोलाचे सहकार्य केले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
