डॉ. कृष्णा विजयकुमार पाटील यांचा गौरव सोहळा उदगीर = के.आय.एम.एस हॉस्पिटल हैद्राबाद येथील सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट (किडणीविकार तज्ञ ) डॉ. कृष्णा विजयकुमार पाटील यांना लोकप्रिय आऊटलुक मासिकाने "बेस्ट नेफ्रोलॉजिस्ट साऊथ" व एशिया टुडे मिडीया तर्फे "प्राईड ऑफ नेशन" अवार्ड देऊन गौरव केला आहे त्याबद्दल बुधवारी (ता.२५) सायंकाळी ५ वाजता रघुकुल मंगल कार्यालयात त्यांच्या मित्रांनी आपल्या मिञाचा गौरव सोहळा आयोजित केला आहे. याप्रसंगी माजी मंञी दिलीपराव देशमुख , शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. पाटील यांचे मुळ गाव उदगीर असुन त्यांनी कॅनडाच्या ओटावा विद्यापीठातून क्लिनिकल नेफ्रोलॉजीमध्ये फेलोशिप केली आहे, नेफ्रोलॉजिच्या क्षेत्रात असामान्य योगदान दिले आहे श्री बालाजी डायग्नोस्टिक हि त्यांची लॅब देशातील दुसरी खाजगी लॅब आहे. त्यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यतचे शिक्षण उदगीर येथे झाले असुन त्यांचा शालेय जिवनापासुन सोबत असलेल्या मिञांच्या वतिने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व मिञ परिवार व नागरीकांनी उपस्थित राहवे असे अवाहन आयोजक अजित शिंदे , अशिष पाटिल राजुरकर व मिञ परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
