मजविपच्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न उदगीर :- येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शालेय व महाविद्यालयीन गटातील निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. रामप्रसाद लखोटिया होते. मंचावर सहसचिव प्राचार्य डॉ.दत्ता पाटील यांची उपस्थिती होती. शालेय गटात प्रथम लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा कुणाल विष्णू पाटील रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ,द्वितीय छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाचा बोधवापोड कार्तिक राजीव रोख दोन हजार रुपये स्मर्तिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय शामर्या कन्या विद्यालयाची समीक्षा श्रीकृष्ण परगे, रोखएक हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ छत्रपती राजर्षी शाहू सैनिक विद्यालयाचा अभिषेक साईनाथ झीलकरवार रोख पाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रणिता बुद्धिवंत रोख पाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, महाविद्यालयीन गटात संत तुकाराम विधी महाविद्यालयाची अर्गीता नंद प्रकाश विश्वनाथे रोख तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र ,द्वितीय रेणुका राजकुमार जाधव श्री हावगि स्वामी महाविद्यालय रोख दोन हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय श्री हावगी स्वामी महाविद्यालयाची प्रांजल संतोष स्वामी रोख एक हजार रुपये स्मर्तिचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर पोगा ऋषिकेश बालू पाचशे रुपये रोख व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, संत तुकाराम विधी महाविद्यालयाची बिरादार श्रद्धा सुनील हीस रोखपाचशे रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्रामात लातूर जिल्ह्याचे योगदान आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर युवकांची विकासात्मक भूमिका या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या स्पर्धेचे परीक्षण प्रा. अर्जुन सोमवंशी, बाबुराव माशाळकर, प्रा. डॉ.नरसि गकदम ,प्रा. विलास गाजरे यांनी केले. शहरातील विविध अडोतीस शाळा महाविद्यालयातील चाळीस हजार विद्यार्थ्यांमध्ये गाथा मुक्ती लढ्याची व्याख्यान देणाऱ्या वक्ते विशाल तोंडचिरकर, प्रा. डॉ.गौरव जेवळीकर ,बालाजी मूस्कावाड ,प्रा.डॉ. दत्ता हरी होनराव, प्रा. धनराज बंडे, मुरलीधर जाधव, राजेंद्र चव्हाण,विश्वनाथ बिरादार माळवाडीकर यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धेचे प्रायोजक अनिल पत्तेवार ,विशाल तोंडचिरकर ,प्रा. डॉ. एस .एन .शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शाळा महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला आयोजित केल्याबद्दल उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे, मुख्याध्यापक ए. बी. हक्के, अनिता येलमटे ,बाबुराव पाटील, प्रतीक्षा मुंडकर ,शंकर हम्पले यांना प्रतिनिधीकस्वरूपात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुशांत शिंदे म्हणाले मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत नेऊन जनजागृती केल्याबद्दल मराठवाडा जनता विकास परिषदेचे कौतुक केले, परिस्थितीचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचे आवाहन केले, स्तुत्य उपक्रमाबद्दल तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी विद्यार्थी व संस्थाचालक, शिक्षकांचे अभिनंदन केले. समारोपात डॉ. लखोटिया यांनी स्वराज्याचे सूराज्यात रूपांतर होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले . स्वागत गीत रेखा माने यांनी गायले.प्रास्ताविक प्रा. एस .एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहूरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव कल्याणकर, दीपक बलसुरकर ,गणेश मुंडे यांच्यासह मराठवाडा जनता विकास परिषदेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले
Popular posts
शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीर नगरपालिकेवर युतिचा झेंडा फडकेल = बस्वराज पाटील मुरूमकर 👉 आत्ताच विरोधकांची झोप उडाली उदगीर= उदगीर नगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकणार असल्याने विरोधकांची झोप उडाली असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे उदगीर येथे युतीच्या उमेदवारा ची माहिती देण्यास बोलावलेल्या पत्रकार परिषदे नंतर उदगीर समाचार सोबत बोलताना पाटील म्हणाले की उदगीर नगर पालिके वर युती चा झेंडा फडकणार असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,आज विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, देशात भाजप्,राज्यात युती चे सरकार असून आम्ही जो विकास केला आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा वर स्वाती सचिन हुडे व आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या न भूतो न भविष्ती अशा मतांनी विजयी होतील यात आम्हाला शंका नाही असेही ते म्हणाले या वेळेस आ संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, मा. आ.गोविंद केंद्रे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
Image
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल