अक्षरनंदन शाळेतील शालेय पोषण आहाराचा माल बाजारात विक्रीस जाताना पकडला, गुन्हा दाखल 👉 या प्रकरणाने अनेक शाळेचे पोषण आहार बाहेर जाण्यास लागले लगाम ? उदगीर = येथील नळेगाव रोड वरील अक्षर नंदन शाळेतील विद्यार्थ्यांच्या खाऊ बाजारात विक्रीस नेत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धरला होता 24 तास चाललेल्या घडामोडी नंतर या प्रकरणात यातील आरोपी 1.माधव हलगरे 2.शिवशंकर जीवणे 3. पोषण आहाराचे कामकाज पाहण्यासाठी नेमुन दिलेला शिक्षक 4.कैलास व्यंकटराव बीबराळे सर्व रा.अक्षरनंदन शाळा,उदगीर यानी संगणमत करुन शासनाने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यासाठी मध्यान्न भोजना करीता शाळेस वितरीत केलेल्या पोषण आहाराचा स्वताच्या अर्थिक फायद्यासाठी पीकअप क्र. एम.एच. 12 एस.के. 0597 या वाहणाचा वापर करुन 98,875/- रु.कीमतीचा शालेय पोषण आहाराचा अपहार करुन खुल्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने घेउन जात असताना मिळुन आला होता शफी कासीमसाब शेख वय 53 वर्षे व्य. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर रा. ह.मु. निडेबन उदगीर मुळ गाव उमरदरा ता. शिरुरु अनंतपाळ जी.लातूर यांच्या तक्रारी वरून ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर येथे गु.र.नं. 637/2023 कलम 409,34 भा.दं.वि. मा.पो.नि.सो.यांचे आदेशाने दाखल केला असून पुढील तपास पोउपनि चेरले हे करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
