रिंग रोड़ वर मृत जनावराचा खच, प्रवासी परेशान 👉 मृत डुकरे रस्त्यावर कोण फेकत आहेत, यास जबाबदार कोन उदगीर= उदगीर येथिल रेस्ट हाऊस ते बिदर गेट रिंग रोड़ वर कमीत कमी 30 ते 40 मृत डुकरे फेकण्यात आली असून , यात काही मृत डुकरे फुगून गेली तर काही सडून दुर्गंधी सुटली असून , या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधी चा सामना करावा लागत असून या कडे त्वरीत लक्ष नाहीं दिल्यास या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोग राई उदभऊ शकते, पण या कडे पाहण्यास कोनास ही वेळ नाही असे दिसत असून, एवढ्या मोठया प्रमाणावर मृत डुकरे रिंग रोड च्या दोन्ही बाजूस टाकत आहेत तरी प्रशासन मूग गिळून गप्प का बसले आहे हे समजत नाही, या समस्येस जबाबदार कोन कोन आहेत हे ही समजत नाही
• श्रीनिवास मदनलाल सोनी