व्यक्ति ची ओळख परिवारामुळे पण संवाद हरवला> जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे 👉 पाल्यांना प्रॉपर्टी नाहीं संस्कार द्या उदगीर:- लातूर येथील राजस्थानी महिला मंडळ च्या 35 व्या वर्ष पूर्ती वर आयोजीत आज का वार परिवार एक दिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी लातूर जिल्हा च्या पहिल्या महीला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे म्हणाल्या की व्यक्ती ची ओळख परीवारामुळे होते पण आज घरे मोठी झाली ,सर्व सुखसोयी उपलब्ध झाल्या पण संस्कार हरपला आहे,आज भौतिक झगमगाटात फक्त फोटो पुरताच परिवार दिसत आहे, महीला मुळे परिवार सक्षम , आता महीला हाऊस वाइफ नाहीत तर त्या होम मेकर असून त्यांनी मुलांना संस्कार द्यावेत ज्या मुळे पाल्य वाया जाणार नाहीत,आज वरिष्टा सोबत संवादासाठी वेळ नाही, मुलांना प्रॉपर्टी नाहीं संस्कार द्यावे, संस्कार फक्त महिलाच देऊ शकतात असे ही त्यां म्हणाल्या, या अधिवेशनास प्रमूख अतिथी म्हणून श्यामजी जाजु,कमलकिशोर अगरवाल सोबत महीला मंडळ अध्यक्ष श्रीमती सुजाता लोया,सचिव अर्चना सोमाणी सह सर्व पदाधिकारी, सदस्या सह लातूर जिल्हयातील सर्व तालुक्यातून मोठया संख्येने समाज बांधव, महीला उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
