फटाके फोडणाऱ्या बुलेट सायलेन्स वर पोलिस प्रशासनाने फिरवले रोड रोलर 👉 शहर पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांची धडाकेबाज कार्यवाही उदगीर = शहरामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर समस्या असून त्यास भरीत भर म्हणून शहरात मोठ्या प्रमाणावर मॉडिफाइड सायलेन्सर वापरून आवाज काढत मोठ्या प्रमाणावर बुलेट रस्त्यावर होते, वाहतूक नियमन करताना अशा बुलेट धारकावर विशेष मोहिमेअंतर्गत कठोर धडक कारवाई मागील सहा महिन्यात करण्यात येऊन शंभरहून अधिक मॉडिफाइड बुलेट धारकावर दीड लाख रुपये दंड आकारून सदर सदरचे सायलेन्सर जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर आज रोजी रोड रोलर फिरून सदरचे नष्ट करण्यात आले आहेत सोबत पोलिस प्रशासनाने ध्वनी प्रदूषण करणारे अनधिकृत मॉडिफाईड सायलेन्सर वापरू नयेत त्याचप्रमाणे फॅन्सी नंबर प्लेट दादा, काका, भाऊ अशा वापरणाऱ्या वर आणि विना नंबर वाहन वापरणाऱ्या वर कार्यवाही करण्याचे संकेत दिले असून नागरिकांनी वाहनधारकांनी तात्काळ फॅन्सी नंबर्स स्वतःहून काढून घ्यावेत मोटरसायकलवर आरटीओ मान्यता प्राप्त फॉरमॅटमध्येच नंबर देखील टाकण्यात यावेत अन्यथा अशी वाहने दंडास पात्र ठरतील असे म्हंटले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर रिक्षांची संख्या असून रिक्षामध्ये अनाधिकृत पद्धतीने साउंड बॉक्स लावून मोठ्या आवाजात गाणे घोंगट केला जात आहे ही बाब निदर्शनास आल्यानंतर धडक कारवाई करून सदर रीक्षा मधील 90% अधिक रिक्षा मधील साउंड बॉक्स काढून टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मध्यभागी वापरण्यात येणारा आरसा देखील काढण्यात आला आहे आणि रिक्षा धारकांना युनिफॉर्म बंधनकारक करण्यात आलेला असून त्यांनी त्याचं पालन करणे आवश्यक आहे अन्यथा अशा रिक्षाचालकावर पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री अजय देवरे, उदगीर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिलीप भागवत पोलस निरिक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार मोती पवळे पोलीस शिपाई अवी फुलारी, पोलीस शिपाई गणेश बामणे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस नाईक शिवपुजे यांच्या पथकाने केलेली आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
