भाऊसाहेब सहकारी बॅंकेच्या चेअरमनपदी भगवानराव पाटील यांची फेरनिवड उदगीर = भाऊसाहेब सहकारी को. ऑप. बँक लि. उदगीरच्या चेअरमनपदी भगवानराव पाटील तळेगावकर व व्हाईस चेअरमनपदी वसंतराव सोनकांबळे यांची फेरनिवड करण्यात आली. भाऊसाहेब सहकारी बँकेची सन २०२३-२०२८ साठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी बी. एस. नांदापूरकर (निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सह. संस्था, उदगीर) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी चेअरमनपदासाठी भगवानराव पाटील यांचा तर व्हाईस चेअरमनपदासाठी वसंतराव सोनकांबळे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री नांदापूरकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर झाल्यानंतर सर्व संचालक, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी किशनराव हरमुंजे, मनोज पुदाले, उत्तरा कलबुर्गे, कोमल बिरादार, ईश्वर खटके, तानाजी पाटील, रविंद्र हसरगुंडे, दिनेश पाटील, गोपीनाथ सगर, विजयकुमार पारसेवार, वैभव औटे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत कुलकर्णी, शाखाधिकारी शिवाजी पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री शिंदे यांची उपस्थिती होती.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
