किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर च्या अध्यक्ष पदी श्रीरंग पाटील तर सचिव पदी पांडुरंग शिंदे उदगीर :- येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर, ताः उदगीर, जि.लातूर नोंदणी क्रमांक एक-१४ (लातूर) या न्यासाच्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक घेवून निवडणूक निर्णय अधिकारी जांबूतकर यानी सदर न्यासाच्या कार्यकारी मंडळात निवडून आलेल्या उमेदवारांची यादी आज दि. २६:११.२०२३ रोजी विद्या वर्धीनी हायस्कुल, उदगीर या शाळेच्या दर्शनी भागावर /सूचना फलकावर डकवून प्रसिध्द केली त्यात अध्यक्ष म्हणून श्रीरंग ज्ञानोबा पाटील ,उपाध्यक्ष माधवराव किशनराव पाटील, सचिव पांडुरंग तुळशीराम शिंदे सह सचिव म्हणून हिरागीर सिहागीर हालकी तर कोष्याध्यक्ष म्हणून गुंडेराव भाऊराव पाटील, सदस्य ज्ञानदेव भाऊराव झोडगे, रामराव नारायणराव एकंबे, काकासाहेब गोविंदराव पाटील ,भिमराव नरसिंगराव पाटील हे निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी जांबूतकर यानी घोषित केले आहे,सचिव पदासाठी दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्याने चिट्टी ने शिंदे विजयी झाले आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
