जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या डोक्यात भरली पदाची हवा,ती उतरवणे जरुरी ॲड. गोमारे 👉 कार्यालयात भेटण्यास येणाऱ्या सामान्य माणसाला तासनतास बसउन जातात निघून 👉 असा अनुभव अनेक पत्रकारांना ही आला उदगीर= लातूर येथील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या डोक्यात पदा ची हवा शिरली असून त्यांनी आपण जन सेवक अहोत कुठले राजा महाराजा नाहीत याचा भान ठेवावा असे लातूर येथील सामाजिक सेवक ॲड. गोमारे यानी म्हंटले आहे लातूर येथील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या डोक्यात सद्या पदाची हवा शिरली असून ते कार्यालयात भेटण्यास येणाऱ्या सामान्य माणसाला हिन वागणुक देत आहेत,अनेक तास बसून ही ते भेटत नाहीत, हे त्यांना शोभत नसून त्यांनी आपण कुठले राजा महाराजा नसून आपण जनसेवक आहोत शासनाचे आपणास जनतेच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ठेवलें आहे याचे भान ठेवावे अन्यथा येथील सामान्य माणसाला आपल्या डोक्यातील पदा ची हवा उतरवावी लागेल असेही त्यांनी म्हंटले असून जिल्हाधिकारी यांच्या वागण्याच्या प्रत्यय अनेक पत्रकारांना ही आल्याचे अनेक पत्रकार ही दबक्या आवाजात बोलत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
