सोमनाथपुर, रोड वरील अवैध बांधकामास कोणाचे अभय? 👉 ग्रामसेवकाकडे तक्रार करून ही ग्रामसेवक मूग गिळून गप्प ? उदगीर:- नांदेड रोड बोंद्रे यांच्या बाजूस सोमनाथपुर ग्रामपंचायत हद्दीत वैजेनाथ (शिवयोगी) तोंडारे अप्पा यांनी रोड वर अतिक्रमण करून जे हौद,बांधकाम केले आहे ते त्वरीत काढावे म्हणून 20/11/2023 रोजी सोमनाथपुर येथील ग्रामसेवकाकडे नरसिंग कांबळे, बस्वराज बोंद्रे, सत्यप्रकाश डांगे,किरण बोराळे, उदय केंद्रे, भरत कोंडेकर, महिंद्रकर संजय, शिवाजी वाघमारे, राजेश्वर भाटे,विवेक बिरादार , प्रसन्ना कांबळे यांच्या सह्यानी निवेदन दिले असतानाही आज पर्यंत कर्तव्यदक्ष ग्रामसेवकांनी कुठलीच कार्यवाही न केल्याने या अवैध हौद बांधकामास, रोड वरील अतिक्रमनास यांचा छुपा पाठिंबा तर नाही ना असे तक्रारदाराना वाटत आहे,सदरील अतिक्रमण त्वरीत काढावे अन्यथा आम्हास तीव्र आंदोलन करावे लागेल असेही त्यांचे म्हणणे आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

