उदगीरच्या पत्रकारांना कमी लेखणे क्रीडा व युवक विभागास पडले महागात ? 👉 उदगीर येथील राज्यस्तरीय युवक महोत्सवात स्थानिक पत्रकारांनी निषेध व्यक्त करत आयोजक, जिल्हा क्रीडा अधिकारी, आयात पत्रकाराविरुढ केला शिमगा उदगीर:- क्रीडा व युवक मंत्रालया च्या संचालनालया मार्फत उदगीर येथील जिल्हा परिषद ग्राउंड वर 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यन्त राज्यस्तरीय युवक महोत्सव आयोजीत केला खरा पण या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेतूपूरक उदगीर येथील स्थानिक पत्रकारांना दूर ठेवले,त्यांना निमंत्रण पत्रिका ही दिली नाही तर दुसरीकडे लातूर येथे महोत्सवाच्या लोगो चे अनावरण केले, तर उदगीर येथील पत्रकारांना सोडुन लातूर येथील पत्रकारांना वाहने देऊन सन्मानपूर्वक उदगीर येथील कार्यक्रमास घेऊन आल्याने स्थानिक पत्रकारांनी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमातच आयोजक, क्रीडा अधिकारी व आयात पत्रकारांचा निषेध करत शिमगा साजरा करून कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याने आयोजकांना थंडी मध्ये ही घाम फोडला उपस्थित क्रिडा मंत्र्या सह वरिष्ठाची गोची झाली , क्रीडा व युवक विभागास उदगीरच्या स्थानिक पत्रकारांना दूर ठेवने महागात पडले असून आता वरिष्ठ या मूर्ख अधिकाऱ्यांवर काय कार्यवाही करतात हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

